Sunday, February 5, 2012

८९ वा कार्यक्रम


“मतदार राजा जागा हो...” साठीच्या
विशेष मोहिमेत सहभागी होऊया - मोहिमेचा सक्रिय भाग होऊया...

येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ’लोकांचे शासन व लोकाभिमुख प्रशासनाच्या आग्रही मागणीसाठी आणि मतदार जागृतीसाठी’ “एक शाम... मतदारोंके नाम” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रामात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितांना यानुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत.

यास्तव ’लोकांनी - लोकांची - लोकांसाठी चालविलेली’ व ’जगाच्या पाठीवर सर्वात मोठी गणली जाणारी आपली “लोकशाही व्यवस्थे”चे पाईक या नात्याने ती अधिक सुदृढ व मजबुत करण्यासाठी सदर कार्यक्रमाला आपल्या माध्यमातुन व्यापक प्रसिद्धी मिळावी आणि आपला प्रत्यक्ष वा प्रातिनिधीक सहभाग, सहयोग व मार्गदर्शन मिळावे, ही विनंती.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
9820440573/9869240573

No comments: