Wednesday, February 22, 2012


’अत्रे कट्टा, कांदिवली’च्या परिवारातील - परिसरातील नागरिकांसाठी

"मी पाहिलेला - माझ्यातला जगावेगळा वेगळापणा"

 हा विषयावर चर्चात्मक - संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

’व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीनुरुप माणसाची आणि माणुसकीची विविधांगी रुपे जाणुन घेण्यासाठी; जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातुन पाहण्यासाठी; वेगळेपणाचा शोध घेतानाच इतरजनांच्या वेगळेपणातुन बोध घेण्यासाठी; मानवी स्वभावातील विविध पैलू व अंगे अभ्यासण्यासाठी; मनोरंजनाच्या बरोबरीने ज्ञानरंजनासाठी आणि

२१ व २७ फेब्रु. रोजी अनुक्रमे साजऱ्या होणाऱ्या

जागतिक मातृभाषा दिवस व मराठी भाषा दिवसानिमित्त

आपल्या मातृभाषेला - मायमराठीला अभिवादन करण्यासाठी

सदर कार्यक्रमाला आपल्या माध्यमातुन व्यापक प्रसिद्धी मिळावी आणि आपलाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग, सहयोग व मार्गदर्शन मिळावे, ही विनंती.


राजेश जी. गाडे, संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक

No comments: