Thursday, April 26, 2012

मुक्तांगण २०१२

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवलीची स्मरणिका-वार्षिक विशेषांक
मुक्तांगण २०१२ साठी साहित्य पाठविण्याबाबत.

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली या आपल्या समाजाभिमुख उपक्रमाच्या जून २०१२ मध्ये साजऱ्या होणाऱ्या ४थ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन प्रतिवर्षीप्रमाणे यंदा मान्यवरांसह परिवारातील सहभागी-सभासदांच्या साहित्य व इतर लेखनकृतींचा समावेश असलेली आणि कट्टा संस्कृतीला साजेशी मुक्तांगण २०१२ ही संस्मरणीय व संग्राह्य अशी स्मरणिका - वार्षिक विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे.

सदर स्मरणिका-वार्षिक विशेषांकात आपला साहित्यिक सहभाग प्रार्थनीय असुन आपण आपल्या परिचितांनाही याबाबत अवगत करुन देण्यासाठी - प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही विनंती. कळावे.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली



No comments: