Thursday, December 22, 2011


’जनगणमन’ या आपल्या राष्ट्रगीताच्या प्रथम गायनाची शंभरी साजरी करण्यासाठी;
राष्ट्रगीत व त्याची शतकी वाटचाल याविषयीची सविस्तर-अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी;
आपल्या राष्ट्र व राष्ट्रगीताबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी;
राष्ट्रगीतासह इतर राष्ट्रीय मानकांना अभिवादन सादर करण्यासाठी आणि
’जनगणमन’ या राष्ट्रगीताचे समुहगायन करण्यासाठी
सदर कार्यक्रमाला कुटुंबिय आणि मित्रपरिवारासह
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
अत्रे कट्टा, कांदिवलीच्या परिवारातील-परिसरातील
राष्ट्राभिमानी मान्यवर, सहभागी-सभासद व रसिक-जनांनी
कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे,
ही नम्र विनंती.
आपले स्नेहांकित
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कांदिवली
Mobile : 9820440573/9869240573, E-mail :rajeshgade@gmail.com
आणि संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक

Thursday, December 8, 2011


आपल्याला काही वेळा वाटते की "अरे हे करायचं राहुनच गेलं..."
"माझं राहुन गेलेलं कार्य / मला हे करायचं होत... पण जमलच नाही" या "मुक्त कट्टा" कार्यक्रमात या-अशा राहुन गेलेल्या कार्याबद्दल सांगायला आणि ऐकायला
शनि. दि. १०.१२.२०११ रोजी सायं. ५.१५ वा.
मित्र-परिवारासह कार्यक्रमाला आवर्जुन येण्याची कृपा करावी, ही विनंती.


राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

9820440573/9869240573
, rajeshgade@gmail.com
आणि संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक

Monday, December 5, 2011


घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे ५५ व्या महापरिनिरवाण दिनानिमित्त
त्यांचे कार्यकतृत्वाला विनम्र अभिवादन...!!

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली परिवार

Friday, December 2, 2011

मनपा निवडणुका - जाहिर आवाहन

मुंबई महानगरपालिका निवडणुका २०१०


सोबतच्या जाहिर आवाहनात सविस्तर नमुद केल्याप्रमाणे ’लोकांचे शासन व लोकाभिमुख प्रशासन’ या आग्रही मागणीसाठी आणि मतदार-जनजागृतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या ’आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली’ या समाजभिमुख उपक्रमाच्या वतीने फेब्रुवारी २०१२ मध्ये होणाऱ्या ’मुंबई महानगरपालिका निवडणुकां’च्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या “आपला नगरसेवक : कसा असावा...? कसा असेल...?” या विशेष मोहिमेच्या प्रभावी कार्यन्वयनासाठी व यशस्वी आयोजनासाठी आपल्या सूचना, मतें व अभिप्राय आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे.

यानुषंगाने आपले सर्वांचे सर्वतोपरी सहकार्य व सहभाग मिळावा, ही विनंती. धन्यवाद.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
9820440573/9869240573

 

८४ वा कार्यक्रम वृत्तांत

योगसाधना आणि ताणतणाव व्यवस्थापन

“आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली”चा ८४ वा कार्यक्रम नुकताच शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०११ रोजी महावीरनगर - कांदिवली स्थित सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान येथे सपन्न झाला. २६.११ हा तीन वर्षांपुर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेक हल्ल्याचा काळा स्मृतिदिन. शिवाय ज्या वीरांनी आपल्या अतुलनीय धैय - शौर्याने या हल्ल्याचा सामना करुन आपल्याला भयमुक्त केल त्या वीरांचे व हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधुन कार्यक्रमाच्या सुरवातीला शहिदांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन वीर शहिदांना पुष्पांजली वाहण्यात आली.

यावेळी ’संवाद’ या चर्चात्मक कार्यक्रमात “पवारांवरील हल्ल्यावर अण्णा हजारेंनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया” या विषयावर झालेल्या मुक्त चर्चेत हिरीरीने सहभागी होताना सहभागी-सभासदांनी मतमतांतरे व्यक्त केली. या साधकबाधक चर्चेनंतर शेवटी असा सूर निघाला की, “श्री. अण्णा हजारे हे मर्यादित स्वरुपात गांधीवादी आहेत. त्यांनी सर्वसामान्यांचे मत व्यक्त केले. एवढे मात्र खरे की नेत्यांनी - राजकारण्यांनी आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.”

याआधी मुख्य कार्यक्रमात “योगसाधना आणि ताणतणाव व्यवस्थापन” या विषयावर बोलताना योगशिक्षक श्री. मनोहर जोगळेकर यांनी “ताणतणावापासुन मुक्त होणे कठिण असले तरीही योगाभ्यासाने या ताणतणावांचे नीट व्यवस्थापन करुन यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासुन दूर राहता येते.” हा मुलमंत्र दिला. अष्टांग राजयोगाची आठ अंगे विशद करताना यातील काही आसनांची प्रात्यक्षिके करुन दाखविली व उपस्थितांकडुनही करुन घेतली. चार बंध आणि प्राणायामाचे सोपे २-३ प्रकार दाखवुन तेही उपस्थितांकडुन करुन घेतले. उपस्थित सहभागी-सभासदांनी या कार्यक्रमामुळे योगाभ्यास, व्यायाम व शिस्त यांचे आपल्या जीवनातील महत्व अधोरेखित झाल्याची कबुली देताना कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रामाचे शेवटी २६.११ सह सर्वच ज्ञात-अज्ञात वीर शहिदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली.

शब्दांकन : प्रा. प्रेमानंद सामंत व राजेश जी. गाडे