Saturday, December 29, 2012

शतकोत्तर ११वा म्हणजेच १११वा कार्यक्रम




नव्या वर्षाचा - नवा संकल्प

व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्वाचे साधन’ असणारी
’वाचन संस्कृती’ जपण्यासाठी, जोपासण्यासाठी व वाढविण्यासाठी
विविध संस्थांच्या माध्यमातुन - नानाविध प्रकल्प-योजना राबविण्यात येतात.

’कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक’
 यांचेकडुन
’विनासायास विनामोबदला वाचकांपर्यंत ग्रंथसंपदा’
पोहचविण्यासाठी सुरु असलेल्या आणि
नामांकित व्यक्ती, संस्था व नावाजलेल्या प्रकाशकांचे भक्कम पाठबळ लाभलेल्या
अशाच एका अभिनव योजनेची..

“ग्रंथ तुमच्या दारी...” 
माहिती करुन देणारी
प्रतिष्ठानचे विश्वस्त व वाचनालय समितीचे अध्यक्ष
 श्री. विनायक रानडे यांची प्रकट मुलाखत

आणि

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आणि आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
यांचे संयुक्त विद्यमाने

“ग्रंथ तुमच्या दारात...” योजनेच्या कांदिवली विभागाच शुभारंभ
 कार्यक्रमाला आपला सहभाग प्रार्थनीय आहे.

आपला स्नेहांकित
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
९८२०४४०५७३/९८६९२४०५७३
णि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य व हितचिंतक


Monday, November 5, 2012

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली - शतकोत्तर ६ वा म्हणजेच १०६वा कार्यक्रम

दि. १०-११ नोव्हेंबर पासुन सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त

"दिपोत्सव २०१२"

आणि  नुकतेच यशस्वीपणे आयोजित केलेल्या
31st OCT.'12 : NO AUTO-TAXI DAY च्या जनआंदोलनाचा  
  "आनंदोत्सव"
साजरा करताना या जनआंदोलनाची वाटचाल, सहभाग, अनुभव व अपेक्षा यांविषयी

31st OCT.'12 : NO AUTO-TAXI DAY
 चा
असा झाला प्रवास

अंतर्गत सविस्तर चर्चा करतानाच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आणि 
त्याच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेण्याविषयी विचारविनिमय करण्यासाठी

या आंदोलनात सहभागी झालेल्या व काही कारणास्तव सहभागी होऊ न शकलेल्या अशा समस्त मुंबईकरांनी यावेळी या कार्यक्रमाला आवर्जुन यावे, ही विनंती.

राजेश जी. गाडे
संशापक व मुख्य संयोजक -आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली


Saturday, October 13, 2012

शतकोत्तर ५वा म्हणजेच १०५वा कार्यक्रम

दिवसेंदिवस भंयकर होत चाललेल्या  व महत्वाच्या ठरणाऱ्या "जागतिक तापमानवाढी" (global warming) च्या समस्येविषयी लोकांत असणारी माहिती व जागृतता तपासण्यासाठी आणि याविषयीची सजगता अंगी बाणवण्यासाठी

निज भाद्रपद कृ. १३ शके १९३४, शनिवारदि. १३ ऑक्टोबर २०१२ रोजी सायं. ५.१५ वा.
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर-लिंक रोडलगत, कांदिवली (प.) येथे

जागतिक तापमान वाढ : आपली माहिती-कल्पना आणि वास्तव...

याविषयावर आयोजित चर्चात्मक-प्रबोधनात्मक कार्यक्रमला
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
आणि संयोजक, संयोजक समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक