Tuesday, June 10, 2014

’विचारमंथनाच्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ आणि सामान्यजनांचे मुक्तपीठ’ म्हणुन मुंबईत विशेषत: पश्चिम उपनगरातील कांदिवली-बोरीवली-मालाड परिसरात मागील काही वर्षांपासुन विविधांगी उपक्रम व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन परिवारातील - परिसरातील सामान्यजनांसह मान्यवरांकडुन विशेष दाद व नावालौकिक मिळवणाऱ्या
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

या आपल्या समाजाभिमुख उपक्रमाच्या ६व्या वर्धापनदिनानिमित्त
 
समाजातील साहित्याविषयीची अभिरुची वाढविण्यासाठी आणि वाचन व संस्कृती जोपासण्यासाठी सुरु करण्यात येणा-या 
 
साहित्य वाचन कट्टा
 
 (साहित्य अभिरुची आणि वाचन-संस्कृती संवर्धन उपक्रम) 
 
शुभारंभ - कार्यक्रम 

आणि

१४ जून रोजी पाळण्यात येणा-या ’रक्तदाता दिना’चे औचित्य साधुन

रक्तदान शिबीर

आयोजित करण्यात आले आहेत.
 
यावेळी परिवारातील - परिसरातील ज्येष्ठ व सहभागी-सभासदांच्या शुभहस्ते आणि
विभागातील मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत

विभागातील विशेष प्राविण्य व पुरस्कार प्राप्त आणि अमृतमहोत्सवी
 
नागरिकांचा जाहिर सत्कार

करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाला कुटुंबिय व मित्र परिवारासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

 
आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे - संस्थापक व मुख्य संयोजक
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक.