Wednesday, December 10, 2014

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली : १५७ वा कार्यक्रम


शनिवार दि. १३ डिसेंबर २०१४ रोजी सायं. ६ वा.
साफल्य बिल्डिंग टेरेस, एसबीआय/पारिजात बसस्टॉपजवळ, महावीरनगर कांदिवली (प.) येथे

 साहित्यप्रेमींना सामुहिक वाचनातुन साहित्याचा आस्वाद घेता यावा आणि
साहित्यरसिकांमध्ये श्राव्यमाध्यमातुन साहित्य-वाचनाविषयी रुची निर्माण व्हावी या उद्देशाने सुरु चालविला जाणारा

 II साहित्य वाचन कट्टा II

... उपक्रमान्तर्गत ...

एका प्रथितयश साहित्यिकाचे एका पुस्तकातील निवडक भागाचे
जाहिर अभिवाचन

वर्तमानपत्रे, मासिकें, नियतकालिकें व इतर माध्यमातील
वाचनात/ऎकिवात आलेल्या/भावलेल्या
निवडक लेखांचे वाचन व त्या आनुषंगाने चर्चा

आणि

परिवारातील एक साहित्यिक-लेखक यांचेकरवी

पुस्तकाचे अभिवाचन आणि साहित्यप्रेमींशी थेट-संवाद


आयोजित करण्यात आलेले आहेत.

कुटुंबिय व मित्र परिवारासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे - संस्थापक व मुख्य संयोजक
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक.
 
 

Tuesday, August 19, 2014

१५० वा कार्यक्रम

रविवार दि. २४ ऑगस्ट २०१४ रोजी सायं. ५.१५ वा.
शंकरमंदिर सभागृह, कांदिवली गाव, गणेशविसर्जन तलावाशेजारी, कांदिवली (प.) येथे
 
१५० व्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन होणा-या विशेष कार्यक्रमान्तर्गत
शेअरबाजार कारभारी कंपनी एनएसडीएल कंपनीचे उपाध्यक्ष, अर्थविषयक अभ्यासक,
’गुंतवणूक गुरु’कार - लेखक, वृत्तपत्रीय स्तंभलेखक आणि अंर्थसंकल्पीय विश्लेषक

श्री. चंद्रशेखर टिळक

यांचे
मोदी सरकारचे अर्थकारण आणि आपण ...
विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान कार्यक्रमाला
कुटुंबिय व मित्र परिवारासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे - संस्थापक व मुख्य संयोजक
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक.


Thursday, July 24, 2014

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवलीचा १४७ वा कार्यक्रम...

शनिवार दि. २६ जुलै २०१४ रोजी
दत्तमंदिर, डहाणूकरवाडी, कांदिवली (प.) येथे
 
श्रावण महिन्यानिमित्त होणा-या विशेष कार्यक्रमाला
कुटुंबिय व मित्र परिवारासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

 
आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे - संस्थापक व मुख्य संयोजक
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक.



Tuesday, June 10, 2014

’विचारमंथनाच्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ आणि सामान्यजनांचे मुक्तपीठ’ म्हणुन मुंबईत विशेषत: पश्चिम उपनगरातील कांदिवली-बोरीवली-मालाड परिसरात मागील काही वर्षांपासुन विविधांगी उपक्रम व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन परिवारातील - परिसरातील सामान्यजनांसह मान्यवरांकडुन विशेष दाद व नावालौकिक मिळवणाऱ्या
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

या आपल्या समाजाभिमुख उपक्रमाच्या ६व्या वर्धापनदिनानिमित्त
 
समाजातील साहित्याविषयीची अभिरुची वाढविण्यासाठी आणि वाचन व संस्कृती जोपासण्यासाठी सुरु करण्यात येणा-या 
 
साहित्य वाचन कट्टा
 
 (साहित्य अभिरुची आणि वाचन-संस्कृती संवर्धन उपक्रम) 
 
शुभारंभ - कार्यक्रम 

आणि

१४ जून रोजी पाळण्यात येणा-या ’रक्तदाता दिना’चे औचित्य साधुन

रक्तदान शिबीर

आयोजित करण्यात आले आहेत.
 
यावेळी परिवारातील - परिसरातील ज्येष्ठ व सहभागी-सभासदांच्या शुभहस्ते आणि
विभागातील मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत

विभागातील विशेष प्राविण्य व पुरस्कार प्राप्त आणि अमृतमहोत्सवी
 
नागरिकांचा जाहिर सत्कार

करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाला कुटुंबिय व मित्र परिवारासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

 
आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे - संस्थापक व मुख्य संयोजक
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक.
 

 

Thursday, May 1, 2014

Basic Computer & Internet प्रशिक्षण वर्ग शुभारंभ

'संगणक साक्षरता' ही काळाची गरज लक्षात घेऊन 'आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली'च्या पुढाकाराने आणि 'वेबटेक, वेब डेवलपमेंट कोम्प्युटर क्लासेस' यांचेतर्फे परिवारातील व परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि सहभागी सभासदांसाठी वाजवी दरात सुरु करण्यात येणार्या Basic Computer & Internet प्रशिक्षण वर्गाच्या शुभारंभ प्रसंगी शुक्रवार दि. २ मे  २०१४ रोजी सायं. ४.४५ वा. आपली उपस्थिती आणि सदिच्छा अपेक्षित आहेत.

आपला स्नेहांकित
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
९८२०४४०५७३/९८६९२४०५७३