Sunday, July 24, 2011

२३ जुलै रोजी साज-या होणा-या
“वन संवर्धन दिना”निमित्त
निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी व निसर्गाप्रती जाणीवा जागृत करण्यासाठी
’आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली’च्या सहभागी-सभासदांची
“निसर्ग भेट - वर्षा सहल”
रविवार दि. १७ जुलै २०११ रोजी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
येथे आयोजित करण्यात आली होती.
या सहलीत अत्रे कट्टा, कांदिवली परिवारातील सर्व वयस्क मंडळी विशेषत: ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
पैकी एका ज्येष्ठ सहभागी-सभासदांनी नोंदविलेली "आम्हीं म्हातारी मंडळी आपले अत्यंत आभारी आहोत. आम्हां म्हाता-यांच्या जीवनात एका आनंदी दिवसाची भर घातलीत." ही प्रतिक्रिया अगदी बोलकी आणि आमचे प्रयत्न व श्रमांचे चीज करणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सहलीतील काही क्षण सोबत जोडत आहोत. त्याचा मनमुराद आनंद घ्या आणि यानुषंगाने आपली प्रतिक्रिया जरुर नोंदवा. आपली मतें आणि सूचनाचेही स्वागत आहे.



 राष्ट्रीय उद्यानातील गांधी टेकडीवरील - गांधी टोपीतुन दिसणारी मुंबई



















No comments: