नव्या वर्षाचा - नवा संकल्प
व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्वाचे
साधन’ असणारी
’वाचन संस्कृती’ जपण्यासाठी, जोपासण्यासाठी व वाढविण्यासाठी
विविध
संस्थांच्या माध्यमातुन - नानाविध प्रकल्प-योजना राबविण्यात येतात.
’कुसुमाग्रज
प्रतिष्ठान, नाशिक’
यांचेकडुन
’विनासायास विनामोबदला वाचकांपर्यंत ग्रंथसंपदा’
पोहचविण्यासाठी सुरु असलेल्या आणि
नामांकित व्यक्ती, संस्था व नावाजलेल्या
प्रकाशकांचे भक्कम पाठबळ लाभलेल्या
अशाच एका अभिनव योजनेची..
“ग्रंथ तुमच्या दारी...”
माहिती करुन देणारी
प्रतिष्ठानचे विश्वस्त व वाचनालय समितीचे अध्यक्ष
श्री. विनायक
रानडे यांची प्रकट मुलाखत
आणि
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आणि आचार्य अत्रे
कट्टा, कांदिवली
यांचे संयुक्त विद्यमाने
“ग्रंथ तुमच्या दारात...” योजनेच्या कांदिवली विभागाच शुभारंभ
कार्यक्रमाला
आपला सहभाग प्रार्थनीय आहे.
आपला स्नेहांकित
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
९८२०४४०५७३/९८६९२४०५७३
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य व हितचिंतक
No comments:
Post a Comment