४थ्या वर्धापन दिनी
बहारदार ‘मराठी ऊर्दु गजल मुशायऱ्या’ची शानदार पेशकश...
‘विचारमंथनाच्या
सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ आणि सामान्यजनांचे मुक्तपीठ’ म्हणुन कार्यान्वित
असलेल्या ‘आचार्य
अत्रे कट्टा, कांदिवली’ या आपल्या समाजभिमुख
उपक्रमाचा नुकता ४था वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त एका
विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डहाणूकरवाडी - कांदिवली येथे पार पडलेल्या या शानदार कार्यक्रमाची
सुरवात मान्यवर - सहभागी गजलकार सर्वश्री. ए.के. शेख, झहीर शेख, प्रशांत वैद्य,
डॉ. कैलाश गायकवाड, जनार्दन म्हात्रे; विभागातील राजकिय नेतृत्व असलेले माजी उपमहापौर
श्री. रमेश मेढेकर व सदाशिव मते; ज्येष्ठ नागरिक संघ, बोरीवली (पूर्व) च्या सचिव
श्रीमती. रुचिरा दिघे आणि कट्ट्याचे मार्गदर्शक-सभासद श्री. (डॉ.) दत्ता पवार व
ज्येष्ठ सहभागी सभासद सर्वश्री. दत्ताराम कुडतरकर, जयंत वानखडे, सुधीर सरंबळकर,
विष्णू गुरव व श्रीमती. वासंती शुक्ल यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने झाली.
यानंतरच्या ‘एक सांज : मराठी - ऊर्दु गजलेची’ अर्थात ‘मराठी - ऊर्दु गजल मुशायरा’ या मुख्य कार्यक्रमात गजलकार सर्वश्री. ए.के. शेख, झहीर शेख, प्रशांत वैद्य,
डॉ. कैलाश गायकवाड, जनार्दन म्हात्रे यांनी एकसे-एक अशा गजला पेश करुन श्रोत्यांना
मंत्रमुग्ध करुन सोडले. यात भरीस कट्ट्याचे मार्गदर्शक-सभासद श्री. (डॉ.) दत्ता
पवार यांनी आपल्या काही रचना सादर करुन कार्यक्रमात रंगत भरली.
‘अत्रे कट्टा, कांदिवली’च्या प्रथेप्रमाणे यावेळी ‘विभागातील विशेष प्राविण्य व पुरस्कार
प्राप्त मान्यवरांचा सत्कार’ही करण्यात आले. यावर्षीचे या
सत्कारचे मानकरी ठरलेल्या कांदिवलीकर - तुतारीवादक श्री. पांडुरंग शंकर गुरव व
कांदिवलीकर - ट्रेकर श्री. किशोर केणी या व्दयींसोबतच वयोमानाची पंचाहत्तरी
गाठलेल्या परिवारातील-परिसरातील ज्येष्ठ नागरीक सर्वश्री. खांडेकर, गोडे, कदम,
आखाडे व घाडीगावकर या वयोवृद्ध - ज्येष्ठ नागरिकांचाही यावेळी मान्यवरांचे हस्ते
पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन उचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रामाच्या समारोपात गजलकार
सर्वश्री. ए.के. शेख, झहीर शेख व जनार्दन म्हात्रे यांनी आपल्या पुस्तकांच्या
प्रती ‘आचार्य अत्रे
कट्टा, कांदिवली’चे मुख्य संयोजक श्री. राजेश जी. गाडे यांना
भेट म्हणुन दिल्या.
‘आचार्य अत्रे
कट्टा, कांदिवली’ या उपक्रमाच्या व त्या माध्यमातुन होणाऱ्या
विविध कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग असणाऱ्या कट्टयाच्या
संयोजक-संयोजिका सर्वश्री. मधुकर माने, विष्णू गुरव, जगदिश राणे आणि सर्वश्रीमती.
रचना दळवी व मीना जोशी यांचाही यावेळी पुष्पगुच्छ देऊन व गौरवोद्गार काढुन यथोचित
सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या
शेवटी ‘आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली’चे संस्थापक व मुख्य
संयोजक श्री. राजेश ज. गाडे यांनी ‘बऱ्याच ठिकाणी नामवंत
कलाकार वा सेलिब्रिटीजना आणून त्या माध्यमातुन गर्दी गोळा करुन संस्थेचा/उपक्रमाचा
वर्धापन दिन यशस्वी झाल्याचे कृत्रिम दावे केले जातात. मात्र आम्हीं - 'आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली’ने या संकल्पनेला फाटा देऊन आज ‘गजल मुशायऱ्या’च्या कार्यक्रमात गजलप्रेमी - दर्दी
श्रोत्यांची गर्दी खेचून आपला कार्यक्रम यशस्वी करुन दाखवुन एक वेगळा पायंडा
पाडलेला आहे.’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करुन
कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी झालेल्या मान्यवरांचे व सहभागींचे आभार व्यक्त
केले आणि यापुढेही असेच दर्जेदार कार्य करण्याचे व कार्यक्रम देण्याची ग्वाही
दिली. उपस्थित - मान्यवरांनीही ‘आचार्य अत्रे कट्टा,
कांदिवली’च्या टीमच्या कार्याचे कौतुक करुन त्यांच्या प्रयत्नांना विशेष दाद
दिली.
सदर कार्यक्रमाविषयीच्या आपल्या सूचना, अभिप्राय व प्रतिक्रिया जरुर नोंदवा - कळवा,
ही विनंती.