Thursday, December 22, 2011


’जनगणमन’ या आपल्या राष्ट्रगीताच्या प्रथम गायनाची शंभरी साजरी करण्यासाठी;
राष्ट्रगीत व त्याची शतकी वाटचाल याविषयीची सविस्तर-अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी;
आपल्या राष्ट्र व राष्ट्रगीताबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी;
राष्ट्रगीतासह इतर राष्ट्रीय मानकांना अभिवादन सादर करण्यासाठी आणि
’जनगणमन’ या राष्ट्रगीताचे समुहगायन करण्यासाठी
सदर कार्यक्रमाला कुटुंबिय आणि मित्रपरिवारासह
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
अत्रे कट्टा, कांदिवलीच्या परिवारातील-परिसरातील
राष्ट्राभिमानी मान्यवर, सहभागी-सभासद व रसिक-जनांनी
कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे,
ही नम्र विनंती.
आपले स्नेहांकित
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कांदिवली
Mobile : 9820440573/9869240573, E-mail :rajeshgade@gmail.com
आणि संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक

Thursday, December 8, 2011


आपल्याला काही वेळा वाटते की "अरे हे करायचं राहुनच गेलं..."
"माझं राहुन गेलेलं कार्य / मला हे करायचं होत... पण जमलच नाही" या "मुक्त कट्टा" कार्यक्रमात या-अशा राहुन गेलेल्या कार्याबद्दल सांगायला आणि ऐकायला
शनि. दि. १०.१२.२०११ रोजी सायं. ५.१५ वा.
मित्र-परिवारासह कार्यक्रमाला आवर्जुन येण्याची कृपा करावी, ही विनंती.


राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

9820440573/9869240573
, rajeshgade@gmail.com
आणि संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक

Monday, December 5, 2011


घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे ५५ व्या महापरिनिरवाण दिनानिमित्त
त्यांचे कार्यकतृत्वाला विनम्र अभिवादन...!!

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली परिवार

Friday, December 2, 2011

मनपा निवडणुका - जाहिर आवाहन

मुंबई महानगरपालिका निवडणुका २०१०


सोबतच्या जाहिर आवाहनात सविस्तर नमुद केल्याप्रमाणे ’लोकांचे शासन व लोकाभिमुख प्रशासन’ या आग्रही मागणीसाठी आणि मतदार-जनजागृतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या ’आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली’ या समाजभिमुख उपक्रमाच्या वतीने फेब्रुवारी २०१२ मध्ये होणाऱ्या ’मुंबई महानगरपालिका निवडणुकां’च्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या “आपला नगरसेवक : कसा असावा...? कसा असेल...?” या विशेष मोहिमेच्या प्रभावी कार्यन्वयनासाठी व यशस्वी आयोजनासाठी आपल्या सूचना, मतें व अभिप्राय आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे.

यानुषंगाने आपले सर्वांचे सर्वतोपरी सहकार्य व सहभाग मिळावा, ही विनंती. धन्यवाद.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
9820440573/9869240573

 

८४ वा कार्यक्रम वृत्तांत

योगसाधना आणि ताणतणाव व्यवस्थापन

“आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली”चा ८४ वा कार्यक्रम नुकताच शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०११ रोजी महावीरनगर - कांदिवली स्थित सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान येथे सपन्न झाला. २६.११ हा तीन वर्षांपुर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेक हल्ल्याचा काळा स्मृतिदिन. शिवाय ज्या वीरांनी आपल्या अतुलनीय धैय - शौर्याने या हल्ल्याचा सामना करुन आपल्याला भयमुक्त केल त्या वीरांचे व हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधुन कार्यक्रमाच्या सुरवातीला शहिदांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन वीर शहिदांना पुष्पांजली वाहण्यात आली.

यावेळी ’संवाद’ या चर्चात्मक कार्यक्रमात “पवारांवरील हल्ल्यावर अण्णा हजारेंनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया” या विषयावर झालेल्या मुक्त चर्चेत हिरीरीने सहभागी होताना सहभागी-सभासदांनी मतमतांतरे व्यक्त केली. या साधकबाधक चर्चेनंतर शेवटी असा सूर निघाला की, “श्री. अण्णा हजारे हे मर्यादित स्वरुपात गांधीवादी आहेत. त्यांनी सर्वसामान्यांचे मत व्यक्त केले. एवढे मात्र खरे की नेत्यांनी - राजकारण्यांनी आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.”

याआधी मुख्य कार्यक्रमात “योगसाधना आणि ताणतणाव व्यवस्थापन” या विषयावर बोलताना योगशिक्षक श्री. मनोहर जोगळेकर यांनी “ताणतणावापासुन मुक्त होणे कठिण असले तरीही योगाभ्यासाने या ताणतणावांचे नीट व्यवस्थापन करुन यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासुन दूर राहता येते.” हा मुलमंत्र दिला. अष्टांग राजयोगाची आठ अंगे विशद करताना यातील काही आसनांची प्रात्यक्षिके करुन दाखविली व उपस्थितांकडुनही करुन घेतली. चार बंध आणि प्राणायामाचे सोपे २-३ प्रकार दाखवुन तेही उपस्थितांकडुन करुन घेतले. उपस्थित सहभागी-सभासदांनी या कार्यक्रमामुळे योगाभ्यास, व्यायाम व शिस्त यांचे आपल्या जीवनातील महत्व अधोरेखित झाल्याची कबुली देताना कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रामाचे शेवटी २६.११ सह सर्वच ज्ञात-अज्ञात वीर शहिदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली.

शब्दांकन : प्रा. प्रेमानंद सामंत व राजेश जी. गाडे

Tuesday, November 29, 2011

राजकारण्यांचं वस्त्रहरणं...


आणि म्हणुनच राजकारणी लोकं अण्णांच्या कारवायांना घाबरतात तर...? पण काही हरकत नाही अण्णा तुम्हीं तुमची गांधीगिरी सुरुच ठेवा... कारण यांच्या अंगावरची ही शाही वस्त्रे सामान्य माणसाच्या जीवावरच आहेत. ती उतरली तरी हरकत नाही...

Wednesday, November 23, 2011

84 वा कार्यक्रम



कार्यक्रमाला आवर्जुन येण्याची कृपा करावी, ही विनंती.
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

9820440573/9869240573
, rajeshgade@gmail.com
आणि संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक

Friday, November 18, 2011

मैत्र जीवनाचे... (८३वा कार्यक्रम : शनिवार, दि. १२.११.२०११)

मैत्र जीवनाचे... (८३वा कार्यक्रम : शनिवार, दि. १२.११.२०११)

१४ नोव्हेंबरला देशभरात उत्साहात साजऱ्या झालेल्या “बालदिना”च्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०११ रोजी आपल्या अत्रे कट्ट्यावर “मैत्र जीवनाचे...” या परिवारातील सहभागी-सभासदांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस साजरे करण्याचा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तरुण मंडळी, भगिनी व ज्येष्ठ नागरिक अशा सर्ववयीन सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात सभासदांच्या सहभागामुळे उत्तरोत्तर रंगत चढत गेली. सूत्रसंचालक व अत्रे कट्टा, कांदिवलीचे मुख्य संयोजक राजेश गाडे यांनी माणसाच्या आयुष्यातील “वाढदिवसा”चे महत्व विषद करताना “वयाने, अनुभवाने व सर्वांगाने वाढवत नेणारा आणि म्हणुन जीवनानंद देणारा असा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार महत्वाचा असा वार्षिक उत्सव” अशी वाढदिवसाची सहजसोपी व्याख्या सांगुन कार्यक्रमाची खुमासदार सुरवात केली. प्रा. प्रेमानंद सामंत यांनी यावेळी वाढदिवसाचे महत्व, वाढदिवस साजरा करण्याच्या जगभरातील वेगवेगळ्या पद्धती व समजुती, काही अंधश्रद्धा ह्यांचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाची लय लक्षात घेऊन केलेल्या आवाहनाला अनुसरुन वयाची पन्नाशी पुर्ण करणारे व कार्यक्रमाचे विशेष उत्सवमूर्ती असणारे अशोक बिंड यांचेसह प्रकाश परब, सदानंद सुरावकर, श्याम पाठक, रघुनंदन हुकेरीकर, आवळस्कर आदी मंडळींनी आपले वाढदिवसाचे व लग्नाच्या वाढदिवसाचे मजेशीर, गंमतीपर व काहीशे गंभीर अनुभव कथन करुन कार्यक्रमात रंगत भरली. यावेळी आणखी एक उत्सवमूर्ती डॉ. सी.पी. सिंग यांनी आचार्य अत्रे व बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यासोबत घडलेला आपला प्रत्यक्षानुभव सांगुन उपस्थितांना सदगदीत केले.

कार्यक्रमाची प्रासंगिकता व विषयाला अनुसरुन झालेल्या खुल्या चर्चेत ’सध्या प्रचलित असलेली व पाश्चिमात्यांकडुन घेतलेली केक कापण्याची व केक कापताना मेणबत्त्या फुंकण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत बसत नसल्याचा’ सार्वत्रिक सूर परखडपणे ऐकायला मिळाला. यानुषंगाने “वाढदिवस साजरा करताना सरत्या वर्षाच्या मेणबत्तीला फुंकर मारुन येणाऱ्या वर्षाची मेणबत्ती प्रज्वलित करायची” ही व्यवहार्य वाटणारी सूचना स्विकारची किंवा नाही याचा निर्णय आपपल्या परीने घेताना “दुसऱ्या संस्कृतीतील गोष्टींचे अनुकरण करताना आपल्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टींना तिलांजली दिली जाणार नाही” याचीही योग्य ती दखल घेतली जावी” यावर उपस्थितांचे एकमत जाणवले. मगच ती प्रथा प्रचलित करावी, यावर बहुतांशी - उपस्थितांचे एकमत जाणवले. वेगळ्या संकल्पनेतुन साकार झालेल्या या आगळ्या कार्यक्रमाविषयी सभासद व उत्सवमूर्तींनी विशेषत: वासंती शुक्ल, गणेश ठाकूर, दयानंद शानबाग आदींनी विशेष समाधान, आनंद व आभार व्यक्त केले.

शेवटी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ’वाढदिवस सोहळ्या’त परिवारातील महिला सभासदांनी वाढदिवस साजरा केला जाणाऱ्या उत्सवमूर्तींसह सर्वच उपस्थित सभासदांना ओवाळुन औक्षण केले. त्याला ज्येष्ठ सभासद कुडतरकर (बापूजी) यांनी’जीवेत शरद: शतम’ हे स्वरचित गीत गाऊन उत्तम साथ दिली. उत्सवमूर्तींना यावेळी वाढदिवसानिमित्त “तुळशीचे रोप” भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश व शुभेच्छा देण्यात आल्या. पेढे भरवुन व वाटुन कार्यक्रमाची गोडशी सांगता झाली.
-       शब्दांकन : प्रा. प्रेमानंद सामंत व राजेश जी. गाडे

Tuesday, November 15, 2011

आई...


धन्य ती माता जिने जग दाखविले मला ...
आणि म्हणुनच स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
9820440573/9869240573

Tuesday, November 8, 2011

83 वा कार्यक्रम



कार्यक्रमाला आवर्जुन येण्याची कृपा करावी, ही विनंती.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

9820440573/9869240573
, rajeshgade@gmail.com
आणि संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक

Thursday, November 3, 2011


कांदिवली (पश्चिम) स्थित एस.व्ही. रोडलगत असलेल्या "शॉपर्स स्टॉप" या मध्य्म-उच्च्वर्गीयांसाठी असलेल्या शॉपिंग मॉलचा आडोसा धरुन नेहमी बंदोबस्ताला (सर्वसामान्य जनतेच्या की या महागड्या मॉलच्या... कोण जाणे...?) बसणाऱ्या "पोलिसांची गाडी शॉपर्स स्टॉपच्या पुढे गेली खड्ड्यात..."

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
9820440573/9869240573

Monday, October 17, 2011

82 वा कार्यक्रम


23 ऑक्टोबर पासुन साजऱ्या होणाऱ्या

दिवाळीनिमित्त
दिपोत्सव २०११

 आणि

आपली सामाजिक - सार्वजनिक उदासिनता
किती साधक - किती बाधक... ?
या विषयाच्या अनुषंगाने
मुक्त विषय - मुक्त चर्चा - मुक्त चिंतन

आयोजित करण्यात आले आहेत.

उत्साहाचा व प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीचा आनंद घेण्यासाठी; दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि
अवती-भवती जाणवणाऱ्या सामाजिक-सार्वजनिक उदासिनता व त्यायोगे ढासळणारे सामाजिक-सार्वजनिक स्वास्थ यांवर साधक्बाधक चर्चा करण्यासाठी व रिंगणात उतरुन आपली कार्य-कर्तव्यें जाणुन घेऊन सामाजिक-सार्वजनिक सक्रियता दाखविण्यासाठी-वाढविण्यासाठी
कार्यक्रमाला कुटुंबिय आणि मित्रपरिवारासह आपली उपस्थिती व सक्रिय सहभाग प्रार्थनीय आहे.

आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे
(मोबाईल : ९८२०४४०५७३/९८६९२४०५७३)
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक

Wednesday, October 12, 2011


गझलेच्या शब्ददुनियेची सफर करताना सर्वसामान्यांना ‘जिंदगी’चा अर्थ सांगून जग जिंकणारे
गझलसम्राट जगजितसिंग
यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन...!!

Tuesday, October 11, 2011


"आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली" परिवारातील सर्व सहभागी-सभासद आणि हितचिंतकांस 
"कोजागिरी पौर्णिमे"च्या मन:पुर्वक शुभेच्छा.
ही पोर्णिमा आपल्या सर्वांच्या जीवनात वसंताचा सुगंध आणि शारदाचे चांदणे घेऊन येवो आणि त्याच सुगंध आणि चांदणे यांचा लाभ आपणाकडून सर्वांना-सदैव होवो.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
मोबाईल : ९८२०४४०५७३/९८६९२४०५७३