II मराठी भाषा प्रेमी संकल्प - मोहिम II
उद्या २७ फेब्रुवारी - कविवर्य कुसुमाग्रज यांचे जन्मदिनी साजऱ्या होणाऱ्या ’जागतिक मराठी भाषा दिना’चे औचित्य साधुन
महाराष्ट्राची राजभाषा ’मराठी’ला वैभव, प्रतिष्ठा व लोकाश्रय मिळवुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणुन
’मराठी भाषा प्रेमी संकल्प - मोहिम’
सुरु करण्यात येत आहे.
या मोहिमेच्या माध्यमातुन आपणांस - मराठीप्रेमींना
सार्वजनिक ठिकाणी वावरताना, मराठी/अमराठी व्यक्तींशी संवाद साधताना आणि आपल्या दैनंदिनी जीवन-व्यवहारात
II साभिमानाने व आवर्जुन मराठी भाषा दृढ संकल्प II
घेऊन मुंबईत-महाराष्ट्रात मराठी भाषा वापराची आग्रहीभूमिका घेत आपल्या मातृभाषेचा उपमर्द होणार नाही, यासाठी दक्ष होण्याचे कळवळीचे आवाहन करण्यात येत आहे.
यानिमित्ताने आपणही मित्र-परिवार आणि आप्त-स्वकियांसह या ’मराठी भाषा प्रेमी संकल्प - मोहिमे’त सक्रिय होऊन - सार्वजनिक जीवनात मराठी भषेचा वापर करुन मराठी भाषिकांमध्ये भाषाभिमान जागविण्याच्या कार्यात सहभाग नोंदविण्याची कृपा करावी.
राजेश जी. गाडे
( मोबाईल : ९८२०४४०५७३/९८६९२४०५७३, email : rajeshgade@gmail.com )
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
आणि इतर संयोजक/संयोजिका, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक