महाराष्ट्र शासनाने ’भाषा सल्लागार समिती’ने तयार केलेला ’पुढील २५
वर्षांसाठीचा भाषा धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला असुन त्यावर लोकांच्या
प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील विशेषत: पश्चिम उपनगरातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या या भाषाधोरणावर आपला आभिप्राय देता यावा याकरता
'मराठी अभ्यास केंद्र' आणि 'आचार्य अत्रे कट्टा,
कांदिवली'
यांचे संयुक्त विद्यमाने
शनिवार दि. २४ जानेवारी २०१५ रोजी सायं. ५.४५ ते ७.४५ या वेळेत
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर-लिंकरोडलगत, कांदिवली (प.) येथे
महाराष्ट्र शासनाच्या भाषाधोरण मसुद्यावर
खुली चर्चा
आयोजित करण्यात आली आहे.
आपले भाषाधोरण समजुन घेण्यासाठी आणि या भाषाधोरणावर व्यक्त होण्यासाठी
सदर चर्चा-कार्यक्रमाला आपल्या परिवारातील, परिसरातील व संपर्कातील भाषाप्रेमींसह
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे - संस्थापक
व मुख्य संयोजक
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक.