विचारमंथनाच्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ आणि सामान्यजनांचे मुक्तपीठ म्हणुन मुंबईत विशेषत: पश्चिम उपनगरातील कांदिवली-बोरीवली-मालाड परिसरात मागील काही वर्षांपासुन विविधांगी उपक्रम व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन परिवारातील - परिसरातील सामान्यजनांसह मान्यवरांकडुन विशेष दाद व नावालौकिक मिळवणाऱ्या
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
या आपल्या समाजाभिमुख उपक्रमाच्या ५व्या वर्धापनदिनानिमित्त
परिवारातील - परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि सहभागी-सभासदांचा
गायन - वादनाचा रंगतदार कार्यक्रम
" सं गी त सं ध्या ... क ट्टे क ऱ्यां ची "
या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला
श्री. प्रकाश बोरगावकर
संचालक - हेल्प एज इंडिया (HELP AGE INDIA), मुंबई विभाग
यांची विशेष उपस्थिती आणि
श्री. सतीश वागळे आणि सहकारी - ज्येष्ठ नागरिक संघ, गोरेगाव
श्रीमती. परुळेकर आणि सहकारी - ज्येष्ठ नागरिक संघ, कांदिवली (प.)
श्री. दत्तात्रय प्रभु केळुस्कर - ज्येष्ठ नागरिक संघ, कांदिवली (प.)
श्रीमती. मृणालिनी वैद्य - ज्येष्ठ नागरिक संघ, बोरीवली (पूर्व)
श्रीमती. क्षमा शेडगे - ज्येष्ठ नागरिक संघ, बोरीवली (पूर्व)
श्रीमती. मनाली भाट - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
आणि परिवारातील - परिसरातील इतर सभासदांचा सक्रिय सहभाग लाभणार आहे.
यावेळी परिवारातील - परिसरातील ज्येष्ठ सहभागी-सभासदांच्या शुभहस्ते आणि
विभागातील मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत
"विभागातील विशेष प्राविण्य व पुरस्कार प्राप्त नागरिकांचा सत्कार"
करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला कुटुंबिय व मित्र परिवारासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे - संस्थापक व मुख्य संयोजक
आणि इतर संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक.