Wednesday, July 27, 2011



जनावरांना विशेषत: कुत्रे किंवा मांजरांना पोटाचे विकार जडल्यास ते सवयीच्या विपरीत जाऊन गवतही खातात आणि उलटी करतात, ज्यामुळे त्यांचे पोट आपसुकच साफ होते. ही निसर्गाचीच एक देणगी आहे...
Posted by Picasa

Sunday, July 24, 2011

 “भारतीय असंतोषाचे जनक” बाळ गंगाधर टिळक
यांचे १५५ व्या जन्मदिनानिमित्त

आणि


क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद
 यांचे १०५ व्या जन्मदिनानिमित्त

भारतमातेच्या या सुपुत्रांना
“आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली” परिवाराच्या वतीने
विनम्र अभिवादन !!!
२३ जुलै रोजी साज-या होणा-या
“वन संवर्धन दिना”निमित्त
निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी व निसर्गाप्रती जाणीवा जागृत करण्यासाठी
’आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली’च्या सहभागी-सभासदांची
“निसर्ग भेट - वर्षा सहल”
रविवार दि. १७ जुलै २०११ रोजी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
येथे आयोजित करण्यात आली होती.
या सहलीत अत्रे कट्टा, कांदिवली परिवारातील सर्व वयस्क मंडळी विशेषत: ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
पैकी एका ज्येष्ठ सहभागी-सभासदांनी नोंदविलेली "आम्हीं म्हातारी मंडळी आपले अत्यंत आभारी आहोत. आम्हां म्हाता-यांच्या जीवनात एका आनंदी दिवसाची भर घातलीत." ही प्रतिक्रिया अगदी बोलकी आणि आमचे प्रयत्न व श्रमांचे चीज करणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सहलीतील काही क्षण सोबत जोडत आहोत. त्याचा मनमुराद आनंद घ्या आणि यानुषंगाने आपली प्रतिक्रिया जरुर नोंदवा. आपली मतें आणि सूचनाचेही स्वागत आहे.



 राष्ट्रीय उद्यानातील गांधी टेकडीवरील - गांधी टोपीतुन दिसणारी मुंबई



















Saturday, July 9, 2011


रसिका जोशी...  या गुणी अभिनेत्रीने रसिकांच्या मनात आपली अशी जागा बनवली होती.
मराठी रंगभूमीवरची एक गुणी, अभिनयसंपन्न व कसदार अभिनेत्री अकाली गेली.
तिच जाणं मनाला धक्का लावणार आहे.
ईश्वर तिच्या आत्म्याला चिरशांती देवो...